विसापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST2021-05-15T04:37:16+5:302021-05-15T04:37:16+5:30

पुसेगाव : विसापूर (ता. खटाव) येथे रणपिसे वस्तीशेजारी मोकळ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली पुसेगाव पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर कारवाई ...

Raid on gambling den at Visapur | विसापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा

विसापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा

पुसेगाव :

विसापूर (ता. खटाव) येथे रणपिसे वस्तीशेजारी मोकळ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली पुसेगाव पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांना मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव पोलिसांनी विसापूर (ता. खटाव) येथील रणपिसे वस्तीशेजारील मोकळ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली नऊजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळणाऱ्या नऊजणांची अंगझडती व घटनास्थळी तपासणी केली असता त्यांच्याकडे रोख रक्कम ७ हजार ५६० रुपये व ३ मोबाईल तसेच एक मोटारसायकल असा एकूण ४३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच आरोपी विनाकारण घराबाहेर पडल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे दंड असा एकूण चार हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on gambling den at Visapur