साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:41 IST2021-05-27T04:41:23+5:302021-05-27T04:41:23+5:30

सातारा : शहरात पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका राहत्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार ...

Raid on a gambling den in Satara | साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा

सातारा : शहरात पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका राहत्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ४६० रुपयांची रोकड आणि पत्त्याची पाने, मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरातील मल्हार पेठेतील एका घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता सचिन खंदारे (४०, रा. मल्हार पेठ, सातारा), अमोल वायदंडे (३५, रा. शनिवार पेठ, सातारा), सूरज चंद्रकांत शिंदे (३८, रा. मल्हार पेठ, सातारा), सूरज अशोक वायदंडे (२७, रा. मल्हार पेठ, सातारा), ज्ञानेश्वर बबन लांडगे (४५, रा. कर्मवीर कॉलनी, सातारा), महेश शिवकुमार दरवेशी (३०, रा. २७५, मल्हार पेठ, सातारा), विलास त्रिंबक धर्माधिकारी (५०, रा. शनिवार पेठ, सातारा), अशोक शंकर कदम (६८, रा. मल्हार पेठ, सातारा) हे जुगार खेळताना आढळले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सापडलेली रोकड, साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलिसांनीच दाखल केला आहे.

Web Title: Raid on a gambling den in Satara