राहुल पाटील-पार्लेकर यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST2021-09-16T04:48:17+5:302021-09-16T04:48:17+5:30

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) गावचे सुपुत्र माजी आमदार दिवंगत आबासाहेब पाटील पार्लेकर यांचे नातू राहुल पाटील यांची ...

Rahul Patil-Parlekar elected as President | राहुल पाटील-पार्लेकर यांची अध्यक्षपदी निवड

राहुल पाटील-पार्लेकर यांची अध्यक्षपदी निवड

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) गावचे सुपुत्र माजी आमदार दिवंगत आबासाहेब पाटील पार्लेकर यांचे नातू राहुल पाटील यांची घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथील शिवम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल राहुल पाटील यांचा सत्कार व सन्मानपत्र देऊन पार्ले येथे सह्याद्री ग्रामविकास पॅनेल व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तानाजीराव नलवडे यांच्याहस्ते मानपत्र प्रधान करण्यात आले. यावेळी सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक अशोकराव पाटील-पार्लेकर, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती नीलम पाटील, माजी सरपंच प्रकाश नलवडे, राजेंद्र नलवडे, उपसरपंच मोहन शिवदास, पार्ले-बनवडी सोसायटीचे अध्यक्ष भगवान पाटील, मोहन नलवडे, बाळासोा नलवडे, नितीन गरवारे, प्रसाद नलवडे, लक्ष्मण नलवडे, श्रीकांत नलवडे, सतीश नलवडे, दिलीप पाटील, संदीप पाटील, महेश नलवडे, प्रवीण पाटील, विक्रमसिंह नलवडे, बाबासोा चव्हाण, महादेव मिसाळ व आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

राहुल पाटील म्हणाले ‘इंद्रजित देशमुख यांनी दिलेली जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे. प्रतिष्ठानचे काम सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक विकासासाठी आहे. त्यासाठी ती जबाबदारी पार पाडेन.

फोटो ओळ ... १५कोपर्डे हवेली..

पार्ले (ता. कऱ्हाड) येथे राहुल पाटील प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना तानाजी नलवडे व ग्रामस्थ.

Web Title: Rahul Patil-Parlekar elected as President