रहिमतपूरला प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:44+5:302021-02-05T09:11:44+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील गांधी चौकामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला सलामी ...

रहिमतपूरला प्रजासत्ताक दिन उत्साहात
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील गांधी चौकामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली.
येथील गांधी मैदानासह विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, विरोधी पक्षनेते निलेश माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, नंदकुमार माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, नगरसेवक, नगरसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून मास्कचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (छाया : जयदीप जाधव) (आवश्यक वाटल्यास घेणे)