रहिमतपूर परिसराला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:20+5:302021-05-22T04:36:20+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला शुक्रवारी पावसाने तडाखा दिला. अचानक आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रहिमतपूर ...

रहिमतपूर परिसराला तडाखा
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला शुक्रवारी पावसाने तडाखा दिला. अचानक आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
रहिमतपूर परिसरात शुक्रवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली आणि बघता बघता वातावरण बदलून गेले. सव्वा सहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली. सुमारे तासभर जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे शेतातून व रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. रहिमतपूरसह परिसरातील साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, अंभेरी, पिंपरी आदी गावाना पावसाने तडाखा दिला आहे.
फोटो : २१ जयदीप जाधव
रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे जोरदार पावसाने शेतात पाणी साचले होते. (छाया : जयदीप जाधव)
===Photopath===
210521\21sat_2_21052021_strsat002001.jpg
===Caption===
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे जोरदार पावसाने शेतात पाणी साचले होते. (छाया : जयदीप जाधव)