राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:56 IST2019-04-07T22:56:08+5:302019-04-07T22:56:14+5:30

वडगाव हवेली : ‘नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे मोदींचे सरकार शेतकरी विरोधी ...

Rafael's face came in front of Modi's true face | राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला

राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला

वडगाव हवेली : ‘नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे मोदींचे सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या पंतप्रधानास राफेलची फाईल व्यवस्थित सांभाळता येत नाही. ती व्यक्ती देश कसा सुरक्षित ठेवेल,’ असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
वडगाव हवेली, ता. कºहाड येथे आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, सुनील काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर, आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील, राजेश पाटील-वाठारकर, आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘जीएसटीची काँग्रेसने चांगली कल्पना आणली होती. देशात समान जीएसटी ठेवायचा होता; पण मोदींनी जीएसटीची अंमलबजावणी खूप किचकट केली. गेल्यावर्षी एक कोटी नोकऱ्या नष्ट झाल्या.

पाच वर्षांत मन की नाही तर धन की बात
गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांची मन की बात नव्हती. तर ती धन की बात होती. महात्मा गांधींच्या धोरणामुळे सत्तेच्या विकेंद्र्रीकरणातून लोकशाही निर्माण केली; पण गेल्या पाच वर्षांत भाजपने विकेंद्रीकरणाचे केंद्र्रीकरण केले व त्यातून हुकूमशाही वाढवली, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Rafael's face came in front of Modi's true face