शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात रब्बीची पेरणी ६० टक्केच, गतवर्षीच्या तुलनेत घट

By नितीन काळेल | Updated: December 2, 2023 17:50 IST

सातारा : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला आहे. भविष्यात पिकांना पाणी कमी पडण्याच्या शक्यतेमुळे ...

सातारा : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला आहे. भविष्यात पिकांना पाणी कमी पडण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी द्विधावस्थेत अडकले आहेत. यामुळे आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सवा लाख हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेण्यात येतात. यातील खरीप हंगाम मोठा राहतो. खरीपातील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार हेक्टर होते. तर आता रब्बीची पेरणी सुरू झाली असून २ लाख १३ हजार २०९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारी क्षेत्र सर्वाधिक राहते. यंदा ज्वारीचे क्षेत्र १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर असून यानंतर गहू ३७ हजार हेक्टरवर, हरभरा २७ हजार ७५३, मका १० हजार २०९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. पण, आतापर्यंतच्या पेरणीचा विचार करता ज्वारीची सुमारे ९५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. पेरणीचे हे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. तर गव्हाची १२ हजार ४४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ३३ टक्क्यांवर जाते. आणखी काही दिवस गव्हाची पेरणी चालणार आहे. त्यामुळे गव्हाच्या पेरणीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर झाली असून हे प्रमाण ३९ टक्क्यांच्या आसपास आहे. मकेचीही पेरणी ७८ टक्के झाली आहे. शेतकऱ्यांनी ८ हजार हेक्टरवर मका पेरणी केली आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवसचे क्षेत्र कमी राहते.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झालेला दिसून येत आहे. कारण, पेरणीसाठी ओल कमी असणे, पेरणी केल्यास पिकांना पाणी कमी पडणार अशी भीती शेतकऱ्यांत कायम आहे. त्यामुळेच पेरणी इजुनही ६० टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. तर गतवर्षी नोव्हेंबरअखेर रब्बीची पेरणी ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी आहे. आता पेरणीचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे पेरणी कुठपर्यंत पोहोचणार याकडे कृषी विभागाचे लक्ष लागलेले आहे.

प्रमुख रब्बी तालुक्यात यंदा पेर कमीच..रब्बीतील सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर आहे. तर यानंतर फलटण ३१ हजार, खटाव ३० हजार हेक्टर राहते. कोरेगाव तालुक्यातही २१ हजार हेक्टरवर क्षेत्र आहे. या तालुक्यात रब्बी पेरणी कमी झालेली आहे. माणमध्ये आतापर्यंत २७ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून हे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. तर खटाव तालुक्यात ६७ टक्के पेरणी झाली आहे. २० हजार हेक्टरवर पीक घेण्यात आले आहे. फलटणला १२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण ४० च्या वर गेलेले आहे. कोरेगावला १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून याचे प्रमाण ६६ टक्के आहे. तर सातारा तालुक्यात ७८ टक्के, जावळी ६० टक्के, पाटण ७६, कऱ्हाड ४३, खंडाळा तालुक्यात ५८, वाई ५७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी