शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात; आतापर्यंत किती झाली, कोणत्या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक राहणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:48 IST

आतापर्यंत माण तालुक्यात सर्वाधिक पेरणी पूर्ण

सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेण्यात येतात, तर उन्हाळी हंगामातील क्षेत्र सर्वात कमी असते. खरिपाचे सर्वसाधारणपणे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते, तर खरिपाच्या तुलनेत रब्बी क्षेत्र कमी असते. यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार २१० हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये ज्वारीचे १ लाख ३५ हजार ५२ हेक्टर, गहू ३७ हजार ३७४ हेक्टर, मका १० हजार २१०, हरभरा २७ हजार ७५४ असे प्रमुख पिकांचे क्षेत्र राहू शकते, तर करडई, सूर्यफूल, तीळ या पिकाखालील क्षेत्र अत्यल्प असते.जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. जिल्ह्यात सध्या रब्बीची पेरणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत ३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे, तर दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने पेरणीला वेग येणार आहे.

ज्वारीची पेरणी साडेचार हजार हेक्टरवर...जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. आतापर्यंत रब्बीची ६ हजार ५०८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी सर्वाधिक आहे. सध्या ४ हजार ४६९ हेक्टरवर ज्वारी पेर आहे, तर गव्हाची १२ हेक्टर, मका १ हजार ८७१, हरभरा ८२ हेक्टरवर घेण्यात आलेला आहे.

माणमध्ये ४६ हजार हेक्टर रब्बी क्षेत्र...जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ४६ हजार ४१९ हेक्टर आहे. यानंतर फलटण तालुक्यात ३० हजार ८१९ हेक्टर, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६७, पाटण १७ हजार ८१०, सातारा तालुका १४ हजार ९७१, कराड १४ हजार ७३२, वाई तालुक्यात १४ हजार ६९०, खंडाळा १३ हजार ९५३, जावळी ८ हजार ११ आणि महाबळेश्वर तालुक्यात अवघे ६४५ हेक्टर क्षेत्र आहे, तर आतापर्यंत माण तालुक्यात सर्वाधिक २ हजार २५६ हेक्टर पेरणी पूर्ण झालेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rabi Season Sowing Begins in Satara District; Jowar to Dominate

Web Summary : Satara district commences Rabi sowing across 2.13 lakh hectares, led by jowar. About 6,500 hectares are sown, with Man taluka leading. Farmers anticipate a good season following favorable rainfall.