शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा, पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 12:24 IST

पाचगणीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना

सातारा : गेल्या तीन दिवसांपासूनच्या सलग सुट्या संपल्यानंतर जिल्ह्यात पर्यटनाला आलेले पर्यटक आणि गावी आलेले चाकरमानी सोमवारी सायंकाळी माघारी फिरले. त्यांच्या वाहनांमुळे साताऱ्यापासून पुण्यापर्यंत महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कऱ्हाड तालुक्यात मलकापूर येथे पुलाच्या बांधकामामुळे आधीच असलेल्या वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. तर महाबळेश्वर, पाचगणीसह इतर पर्यटनस्थळांवरून माघारी निघालेल्या पर्यटकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी मलकापूरजवळ कंत्राटदाराने नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी रविवारी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्हीही लेनवरील वाहतूक उपमार्गावर वळवली. त्यातच सुटी संपवून चाकरमानी कामावर जाण्यासाठी निघाल्याने सोमवारी महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. रस्ता अरूंद व पुलाचे काम आणि वाहनांची वर्दळ यामुळे ठिकठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नाताळच्या सुट्यांमुळे बहरलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीतून पर्यटकांची तुफान गर्दी व वाहनांचा ताफा जिल्ह्याबाहेर निघाला होता. सोमवारी ख्रिसमस सुटी आल्याने पर्यटकांची गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यास मिळाली. सहानंतर बऱ्यापैकी महाबळेश्वरमधील पर्यटकांची वर्दळ परतीच्या मार्गे जाताना दिसून आली. जाताना पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदी करताना दिसून येत होते.पाचगणीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेनापाचगणीत सलग सुट्या आणि नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी-महाबळेश्वर गर्दीने ओसंडून वाहिले. परंतु, जाताना पर्यटकांच्या गर्दी बरोबरच वाहनांच्या गर्दीने वाहतुकीचे तीन तेरा वाजले. महाबळेश्वर ते पाचगणी आणि पाचगणी ते वाई पसरणी घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वरहून पाचगणीत पोहोचण्यासाठी दोन तास लागत होते. त्यामुळे पर्यटकांबरोबरच वाहनचालक त्रस्त झाले. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना तसेच स्थानिक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडीtourismपर्यटनhighwayमहामार्ग