शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हेवर प्रश्नचिन्ह?, ९५ लाखांचा खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 19:25 IST

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट..

सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सर्व्हे करुन अहवालही प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ८२ हजार दिव्यांग दिसून आले असलेतरी सर्व्हेंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, एका संस्थेने हे काम केले असलेतरी एक दिव्यांग शोधण्यासाठी शंभरच्यावर खर्च झाला आहे. परिणामी सर्व्हेवर एकूण ९५ लाखांचा खर्च झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्व्हे खरोखरच संबंधितांपर्यंत पोहोचून झाला का याविषयी चर्चा सुरू झाली आहे.याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्यांना योजनांचा लाभ व्यवस्थित मिळावा, अडचणी येऊ नयेत यासाठी दिव्यांग बांधवांचा सर्व्हे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत काम करण्यात आले. यासाठी जानेवारी महिन्यात टेंडर प्रक्रियाही पार पडली. हे टेंडर राज्यातील एका संस्थेने घेतले. त्यांना जिल्ह्यातील दिव्यांग बांधव शोधून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली. टेंडरनंतर कागदाेपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित संस्थेचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू झाले. या संस्थेने दिव्यांग शोधण्याची मोहीम पूर्ण करुन तीन महिन्यात म्हणजे जूनमध्ये जिल्हा परिषदेला अहवालही सादर केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ८२ हजार दिव्यांग बांधव दिसून आले. हे करताना संबंधित संस्थेला एक दिव्यांग शोधण्यासाठी १०० रुपयांहून अधिक रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार संस्थेचे दिव्यांग सर्व्हेचे बील सुमारे ९५ लाख झाल्याचीही माहिती मिळत आहे. पण, हा सर्व्हे योग्य आणि दिव्यांगांच्या दारी जाऊन संस्थेने केला का ?. त्यांच्याबरोबर दिव्यांगाची तपासणी करणारे कोणी होते का ? याविषयी प्रश्न उभा राहिला आहे. काही संघटनांनी तर सर्व्हे व्यवस्थित झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह आहे.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट..जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हे राज्यात सर्वत्र झालेला नाही. पण, सातारा जिल्ह्याततरी झाला आहे. हा सर्व्हे होण्यासाठी तत्कालिन एका जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट होता, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व्हेविषयी शंका येण्यास वाव असून त्याप्रकारे चर्चाही सुरू झाली आहे.

संस्थेने दिव्यांग कसे ठरवले..संस्थेने हा सर्व्हे करताना कोणाला बरोबर घेऊन केला. दिव्यांग बांधवांपर्यंत कसे पोहोचले याविषयीही चर्चा सुरू झाली आहे. कारण, जिल्ह्यात अजून सर्व दिव्यांग बांधवांना यूडीआयडी ओळखपत्र मिळालेले नाही. त्यामुळे संस्थेने कोणत्या आधारावर आणि त्यांच्याबरोबर सर्व्हेंसाठी कोण बरोबर होते याविषयीही जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर