शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

महिलांच्या चपलांत चिटोऱ्या टाकुन 'खाकी' वर्दीतला पोस्टमन व्हायचा पसार, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 22:38 IST

अखेर ‘तो’ सापडला। आपलेच दात, आपलेच ओठ; कारवाई होणार का?

कऱ्हाड : स्मार्टफोनच्या जमान्यात चिठ्ठी कालबाह्य झालीय; पण कऱ्हाडच्या पोलीस वसाहतीत गत काही दिवसांपासून चक्क चिठ्ठ्या यायला लागल्या. इथे तिथे नव्हे तर चक्क महिलांच्या चपलांमध्ये या चिठ्ठ्या आढळायच्या. त्यामुळे तो ‘पोस्टमन’ कोण, याचीच चर्चा रंगलेली. शनिवारी सकाळी अखेर हा ‘सस्पेन्स’ संपला. चिठ्ठी पाठविणारा अलगद सापडला. आणि ‘खाकी’तल्या या पोस्टमनचा वसाहतीतच शिव्यांची लाखोली वाहत यथेच्छ ‘सत्कार’ही झाला.

कऱ्हाडच्या पोलीस वसाहतीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही हक्काचा निवारा मिळालाय. या वसाहतीत विविध फ्लॅटमध्ये शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. सुख, दु:खात ही पोलीस कुटुंबे एकमेकांना साथ देतात. मात्र, गत काही दिवसांपासून या पोलीस वसाहतीची झोप उडालेली. येथे आगंतुक चिठ्ठ्या यायला लागलेल्या. त्यामुळे महिलांमध्ये अनामिक भीती निर्माण झालेली. स्मार्टफोनच्या जमान्यात ‘चिठ्ठी’ हा खरंतर औत्सुक्याचा विषय; पण तो ‘पोस्टमन’ भलताच हुशार. मोबाईल नंबर हवा, असे लिहून तो त्या चिठ्ठ्या पाठवायचा. घरात नव्हे तर घराबाहेर काढलेल्या महिलांच्या चपलांमध्ये या चिठ्ठ्या सापडायच्या. त्यामुळे दिवसेंदिवस या चिठ्ठ्याची भीती महिलांच्या मनात घर करून राहिली होती. ज्यांना या चिठ्ठ्या सापडल्या त्या महिलांनी कुटुंबात याची कल्पना दिली. त्यामुळे संबंधितांचे कौटुंबिक वातावरणही ढवळून निघाले. संबंधित कुटूंबांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

काही दिवसांपासून याबाबत वसाहतीत जोरदार चर्चा सुरू होती. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत असेल, असे समजून सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत राहिला. आणि वसाहतीमधील कुटुंबांना संताप अनावर झाला. या पोस्टमनला शोधायचं कसं, याचा विचार सुरू असतानाच एकाने त्यावर मार्ग काढला. घराच्या पोर्चमध्ये त्याने कोणालाही माहिती न होता कॅमेरा बसविला. आणि अखेर तो ‘चिठ्ठीबॉय’ अलगद सापडला. शनिवारी सकाळी या प्रकाराने वसाहतीत भलताच गोंधळ उडाला. चपलांमध्ये चिठ्ठी ठेवणाऱ्याला अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले. शिव्यांची लाखोली वाहत त्याचा यथेच्छ सत्कारही झाला. आणि सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असे म्हणणाऱ्या त्या ‘खाकी’तल्या रोमिओला पळता भुई थोडी झाली.वसाहतीत घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित कुटुंबे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. झालेल्या प्रकाराने संबंधित कुटूंब पुरते हादरून गेले आहे. मात्र, त्यातही ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ अशी समजूत घालून ‘कशाला तक्रार करताय’असा सल्ला काहीजणांकडून संबंधितांना दिला जातोय. त्यामुळे काय‘द्याची’ भाषा बोलणाऱ्या त्या चिठ्ठीवाल्यावर कारवाई होणार की मध्यस्थी घालून यावर पडदा टाकला जाणार, हा प्रश्न आहे.

साहेब... हे वागणं बरं नव्हं!पोलीस वसाहतीत ज्याने हा चिठ्ठीचा ‘खेळ’ केला तो साहेबांचा ‘खास’ माणूस. पडत्या फळाची आज्ञा घेत साहेबांच्या मर्जीने काय‘द्याची’ भाषा तो नेहमीच बोलतो. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याचा भलताच रुबाब. फिर्यादी, आरोपी, मध्यस्थी एवढंच नव्हे तर अगदी पोलीस कर्मचाºयांमध्येही त्याचा नेहमीच बोलबोला; पण वसाहतीत घडलेला हा प्रकार निश्चितच निंदनीय आणि वसाहतीच्या शिस्तीला गालबोट लावणारा आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार की ‘साहेब’ पडदा टाकायला मदत करणार, याची उत्सुकता आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसKaradकराड