आनेवाडी टोलनाक्यावर दुप्पट टोलवरून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:39+5:302021-03-16T04:39:39+5:30

पाचवड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अनेक घटनांनी चर्चेत आला आहे. रविवारी (दि. १४) रात्री आनेवाडी नाक्यावर टोल देण्या-घेण्यावरून कर्मचारी ...

Pushback from double toll on Anewadi toll plaza | आनेवाडी टोलनाक्यावर दुप्पट टोलवरून धक्काबुक्की

आनेवाडी टोलनाक्यावर दुप्पट टोलवरून धक्काबुक्की

पाचवड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अनेक घटनांनी चर्चेत आला आहे. रविवारी (दि. १४) रात्री आनेवाडी नाक्यावर टोल देण्या-घेण्यावरून कर्मचारी व लिंब येथील काही तरुण यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विनायक नामदेव तनपुरे व सीमा विनायक तनपुरे (रा. भोर, जिल्हा पुणे) हे दाम्पत्य रविवारी रात्री दहा वाजता टोलनाक्यावरून पुण्याकडे जात होते. त्यावेळी टोल लेन क्रमांक एकवरील कर्मचारी रोहित राजेश सोनवणे (रा. विरमाडे, ता. वाई) याची वाहनचालक यांच्यामध्ये डबल टोलवरून शाब्दिक चकमक झाली. दरम्यान टोल कर्मचाऱ्यांनी संबंधित लेन बंद करून बॅरिकेट लावली व पैसे दिल्यानंतरच गाडी सोडू असे सांगितले. त्यानंतर या दाम्पत्याचे लिंब (ता. सातारा) येथील शुभम अंबर सावंत, सनी सावंत, नीलेश सावंत व आकाश रोकडे (रा. मर्ढे) या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. या सर्व तरुणांनी नाक्यावर येवून शिवीगाळ केली. यावेळी प्रत्युत्तर देताना कर्मचारी व या टोळक्यांमध्ये जोरदार धूमचक्री झाली. सुमारे अर्धा तास याठिकाणी हा गोंधळ सुरू चालू होता. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनीही शिवीगाळ केली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.

Web Title: Pushback from double toll on Anewadi toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.