शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सातारा जिल्ह्यात गावकारभा-यांना धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 12:09 IST

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे. वरकुटे मलवडीत भाजपच्या उमेदवारांचा झेंडा फडकला आहे.

ठळक मुद्देशिरवळमध्ये भाजपचं कमळ फुललं..मलवडीत गोरे बंधुंना सारुन अपक्षाचा विजय किकलीत २५ वर्षांनंतर सत्तांतर

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे.  माण तालुक्यात महिमानगडमध्ये राष्ट्रवादीच्या संगिता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत राखली आहे. तसेच पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्वरवाडी, नरवणे आदी गावांत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आंधळीत काँग्रेसच्या मिनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत काँग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली असून भाजपच्या लक्ष्मी पानसरे सरपंच म्हणून निवडल्या गेल्या आहेत. तसेच आसवलीमध्येही सत्तांतर झाले आहे. भुर्इंजमध्ये काँग्रेसला नऊ तर राष्ट्रवादीला पाच जागा सुरूवातीच्या टप्प्यात मिळाल्या आहेत. कवठेत राष्ट्रवादी सहा तर काँग्रेस पाच तर श्रीकांत वीर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.  काळंगवाडीत सरपंचपदासाठी समान मते पडली असून काँग्रेस व इतर पाच जागांवर असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. किकलीमध्ये भाजपसह इतर जवळपास इतर नऊ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादीला २५ वर्षांनंतर प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे. खटाव तालुक्यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या असून राजाचे कुर्लेमध्ये समरजित राजेभोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये काँग्रेस-भाजपचे जयवंत गोसावी यांना गुलाला लागला आहे. तसेच फलटण तालुक्यात पिंपरद, ताथवडा अन् चव्हाणवाडीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. 

आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले असून संजय व दिवाकर निंबाळकर गटाला सहा तर विश्वासराव निंबाळकर गट तीन जागा मिळाल्या आहेत.