फलटणमध्ये विनामास्कप्रकरणी दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:16+5:302021-03-20T04:38:16+5:30
फलटण : फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये विनामास्क, सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ...

फलटणमध्ये विनामास्कप्रकरणी दंडात्मक कारवाई
फलटण : फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये विनामास्क, सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासाठी फलटणमध्ये पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. यामध्ये नावामास्कच्या ४७ जणांवर कारवाई करून ७ हजार ६०० रुपयांचा दंड, तर सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या ८ घटनांमध्ये ८ हजारांचा दंड असा १५ हजार ६०० रुपयां दंड आकारण्यात आला आहे.
ही कारवाई प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन कोणीही करू नये. यापुढे उल्लंघन करणारे दुकानदार व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन फलटण शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.