गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST2021-03-08T04:37:15+5:302021-03-08T04:37:15+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील मेढा येथे पकडण्यात आलेला गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शनिवारी मेढा ...

गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात
कुडाळ : जावळी तालुक्यातील मेढा येथे पकडण्यात आलेला गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शनिवारी मेढा पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्यातील गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांना मेढ्यात पकडण्यात आले होते. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांत एमपीडीए अंतर्गत पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरा मेढा पोलिसांनी मारणेला पुणे येथून आलेल्या गुन्हे अन्वेषण विभाग तपासणी टीमच्या ताब्यात दिले. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गजा मारणेविरोधातील एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला होता. याची माहिती मिळाल्याने मारणे साथीदारांसह पुणे येथून पसार झाला होता. पुणे ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते. तसेच सातारा जिल्ह्यातील वाई व महाबळेश्वर परिसरात त्याचे वास्तव्य असल्याचीही माहितीही पोलिसांना मिळाली होती. या घडामोडीत तो मेढा पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईमुळे मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व सहकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.