शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरीकरणाचे काम पूर्ण, साताऱ्यातील सुरक्षा तपासणीमुळे पुणे-मिरज रेल्वेमार्ग १४ तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:14 IST

कोरेगाव-तारगाव रेल्वे मार्गाची तपासणी

सातारा/रहिमतपूर : पुणे-मिरजरेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्यात पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा तपासणी करण्यात आली. या कामासाठी १४ तासांचा मेगा ब्लाॅक घेतल्याने दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली हाेती. बऱ्याच प्रवाशांना याची माहिती नसल्याने त्यांना याचा फटका बसला़.पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वे मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्याचे बऱ्याच दिवसांपासून सुरू हाेते.अखेर गुरुवारी पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाची सुरक्षा तपासणीला रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी इलेक्ट्रिक ट्रॉलीच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून अगदी बारकाईने या रेल्वे मार्गाची तपासणी केली. या सुरक्षा तपासणीमुळे या मार्गावर सकाळी दहा वाजल्यापासून १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेस व इतर गाड्या मिरजेतून पंढरपूर, दौंडमार्गे वळविण्यात आल्या.आयुक्त मनोज अरोरा यांनी कोरेगाव ते तारगाव इलेक्ट्रिक ट्रॉलीतून प्रवास करताना जागोजागी थांबून रेल्वेमार्गाची तपासणी केली. त्यांच्यासोबत पाच इलेक्ट्रिक ट्रॉलीसह सुमारे ५० तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा ताफा होता. रात्री सात वाजेपर्यंत तपासणी सुरू होती. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आठ डब्यांची विशेष रेल्वे कोरेगाव ते तारगाव या २३ किलोमीटर मार्गावर प्रति तास ६० ते १०० किलोमीटर गतीने धावली. या रेल्वेमधून रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वत: प्रवास करत चाचपणी केली.

आता अधिकच्या गाड्या धावाव्यातपुणे-मिरज या मार्गावर सध्या काेयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र , चालुक्य, गाेवा एक्स्प्रेस, काेल्हापूर-पुणे एक्स्प्रेस या गाड्या राेज धावत आहेत. आता पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावरून दिवसाला शंभरावर गाड्या धावण्याची क्षमता आहे. त्यामुळे या मार्गावर अधिकच्या गाड्या साेडल्या जाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून व्यक्त हाेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Miraj Railway Line Paralyzed for 14 Hours Due to Safety Checks

Web Summary : Pune-Miraj railway doubling complete; safety checks caused a 14-hour shutdown. Commissioner Arora approved 90 kmph speed. More trains are expected on the route.