‘महसूल’कडून पंचनामा; पण कारवाई टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:23+5:302021-09-07T04:46:23+5:30
जिंती : फलटण तालुक्यातील कुसूर गावामध्ये चारशे ब्रास माती उत्खननाची परवानगी देण्यात होती; पण याठिकाणी एकाच दिवसात दोनशेहून अधिक ...

‘महसूल’कडून पंचनामा; पण कारवाई टाळाटाळ
जिंती : फलटण तालुक्यातील कुसूर गावामध्ये चारशे ब्रास माती उत्खननाची परवानगी देण्यात होती; पण याठिकाणी एकाच दिवसात दोनशेहून अधिक ब्रासचे उत्खनन केले आहे. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तलाठी, मंडलाधिकारी यांच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माती वाहतुकीसाठी पाच ते सहा गाड्यांची परवानगी मिळाली आहे. परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये एक हजाराहून अधिक उत्खनन झाले आहे. या ठिकाणी माती उत्खनन अधिक होत असल्याने शासनाच्या लाखोंचा महसूल बुडवला जात आहे. तसेच नावापुरता फक्त शंभर ब्रासचा पंचनामा केला जातो. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फलटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला गेला आहे. फलटण तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, मंडलाधिकारी हाताशी धरून हा गोरख धंदा सुरू आहे.
(कोट )
कुसूर गावामध्ये परवानगीपेक्षा जास्त माती उत्खनन झाले आहे. त्याठिकाणी पंचनाम्याच्या आधारित नोटीस बजावली आहे. उत्खनन करणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा तहसीलदार कार्यालयाकडे मिळाला नाही. आपण त्यांना आदेश पारित करणार आहे.
- समीर यादव, तहसीलदार फलटण