तपासणी नाक्याच्या कारवाई खात्यावर ‘भोपळा’!

By Admin | Updated: April 23, 2016 00:39 IST2016-04-22T21:50:20+5:302016-04-23T00:39:07+5:30

चोवीस तासात दोन कर्मचाऱ्यांचे ‘रोटेशन’ : वनविभागाचा विजयनगर येथील चेकनाका ‘असून अडचण, नसून खोळंबा’; सात वर्षांत एकही कारवाई नाही

'Pumpkin' on the checking action of Naka! | तपासणी नाक्याच्या कारवाई खात्यावर ‘भोपळा’!

तपासणी नाक्याच्या कारवाई खात्यावर ‘भोपळा’!

कऱ्हाड : कोकणातून केली जाणारी अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी गुहागर-पंढरपूर राज्यमार्गालगत विजयनगर येथे वनविभागाचा ‘चेकनाका’ आहे; पण सध्या हा नाका असून अडचण, नसून खोळंबा या स्थितीत असल्याचे दिसते. नाक्यावर ‘रोटेशन’ पद्धतीने दोन कर्मचारी ‘ड्यूटी’ बजावत असल्याचे सांगितले जाते़ मात्र, प्रत्यक्षात दिवसातील बहुतांशवेळा बराचवेळ चेकनाक्याचे कार्यालय बंद स्थितीत असते.रत्नागिरी, चिपळूणसह कोकणातील अन्य ठिकाणांहून लाकडाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते़ लाकडांनी भरलेल्या ट्रक व कंटेनरची गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावर वर्दळ असते़ अवैधरीत्या होणारी ही वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाने जानेवारी २००९ मध्ये राज्यमार्गालगत कऱ्हाड तालुक्यातील विजयनगर येथे तपासणी नाका उभारला़ त्याठिकाणी काही कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली़ मात्र, गेल्या तीन वर्षांत या तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अवैध लाकडाची एकही कारवाई करता आलेली नाही़ जानेवारी २००९ ते आजअखेर या कार्यालयाच्या ‘खात्या’वर एकाही कारवाईची नोंद नाही़
तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने ‘ड्यूटी’ असते़ या ड्यूटीच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याने राज्यमार्गावरून होणारी अवैध लाकूड वाहतूक रोखणे व लाकूड घेऊन जाणाऱ्या वाहनांकडील परवान्याची तपासणी करणे त्यावर तपासणीचा सही, शिक्का मारणे गरजेचे असते़ मात्र, बहुतांशवेळा कार्यालयच बंद असल्याने लाकूड वाहतूक करणारी वाहने बिनदिक्कतपणे मार्गस्थ होताना दिसतात़
संबंधित कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी कधी रस्त्यावर उभे राहून लाकूड वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करताना दिसत नाही़ कर्मचारी उपस्थित असला तरी तो कार्यालयामध्येच ठाण मांडून असतो़ त्यामुळे कारवाईच्या नावाने अक्षरश: ओरडच आहे. (प्रतिनिधी)

विजयनगर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते. संबंधित नाक्यावर एक महिला व एक पुरूष कर्मचारी रोटेशनने ड्यूटीवर असतात. नाक्यानजीकच त्यांच्या क्वार्टर असून काही वेळासाठी कार्यालय बंद करून ते क्वार्टरला जात असतात. हा नाका कधीही बंद नसतो. आम्ही त्या नाक्याची तपासणी करतो.
- बाबा शिंदे, वनक्षेत्रपाल, कऱ्हाड

कऱ्हाड-पाटण मार्गावरील पळवाटा
पाटण ते कऱ्हाड मार्गाला अनेक रस्ते जोडले गेले आहेत़ निसरे टोलनाक्यापासून वाहनधारकाला ऊरूल मार्गे उंब्रजकडे जाता येते़ म्होप्रेनजीक असलेल्या फाट्यावरून गेल्यानंतर चाफळ फाट्यावर व तेथून पुढे उंब्रजला जाता येते़ तसेच तांबवे फाट्यावरून किरपे, येणके मार्गे कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर कोळे येथे जाता येते़ अवैध लाकूड वाहतूक करणारी वाहने या मार्गांचा वापर करून महामार्गापर्यंत पोहोचतात, त्यामुळे विजयनगर येथे असलेल्या तपासणी नाक्यापर्यंत वाहने पोहोचतच नाहीत.

Web Title: 'Pumpkin' on the checking action of Naka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.