सकारात्मक विचाराने यश खेचून आणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:38+5:302021-09-02T05:23:38+5:30

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण ग्रामपंचायतीच्या वतीने युवकांना भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच सतीश ...

Pull out success with positive thinking! | सकारात्मक विचाराने यश खेचून आणा!

सकारात्मक विचाराने यश खेचून आणा!

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण ग्रामपंचायतीच्या वतीने युवकांना भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच सतीश कापसे, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, ग्रामसेवक संतोष घोडे, शिवाजी यादव, सदाशिव कदम, नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजय कुराडे म्हणाले, येत्या काळात मोठी सैन्य भरती असणार आहे. आपण यासाठी सज्ज रहा. रोज सराव करा. ग्रामपंचायतीने मुलांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शनाचा चांगला उपक्रम राबवला असून याचा मुलांना फायदा होईल. युवकांना अशा चांगल्या बाबीसाठी आम्ही व्यक्तिगतही मदत करू. युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घ्यावे.

रोहित चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रथमेश लोहार यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाटील यांनी स्वागत केले. प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

फोटो : ३१केआरडी०३

कॅप्शन : मंद्रुळकोळे, ता. पाटण येथे सैन्यभरती मेळाव्यात माजी सैनिक विजय कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Pull out success with positive thinking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.