पुकळेवाडीच्या सरपंचपदी पुकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:56+5:302021-02-26T04:54:56+5:30
कुकुडवाड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध झालेल्या पुकळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीही बिनविरोध पार पडल्या. सरपंचपदी सपना महादेव पुकळे, तर ...

पुकळेवाडीच्या सरपंचपदी पुकळे
कुकुडवाड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध झालेल्या पुकळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीही बिनविरोध पार पडल्या. सरपंचपदी सपना महादेव पुकळे, तर उपसरपंचपदी ब्रह्मदेव तुकाराम पुकळे यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
पुळकेवाडीतील यंदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या होत्या. सरपंचपदासाठी इतर मागास प्रवर्ग महिला राखीव आरक्षण सोडत झाल्याने सपना पुकळे यांची सरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केदार गायकवाड यांनी तर बी. बी. खाडे यांनी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामसेवक संतोषकुमार माळवे यांनी सचिव म्हणून काम पाहिले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी माण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, दादासो पुकळे, विलास पुकळे, आनंदा पुकळे, नामदेव पुकळे तसेच ग्रामस्थ व विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले.