वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा : विश्वंभर बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:12+5:302021-09-05T04:44:12+5:30

कुकुडवाड: ‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आपल्या गावाचा विकास आदर्शवत होण्यासाठी गावातील तरुणवर्ग व पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन वृक्षारोपण करणे गरजेचे ...

Public participation of villagers is important for tree planting: Babur all over the world | वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा : विश्वंभर बाबर

वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा : विश्वंभर बाबर

कुकुडवाड: ‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आपल्या गावाचा विकास आदर्शवत होण्यासाठी गावातील तरुणवर्ग व पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, तसेच वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी केले.

देवापूर (ता.माण) येथे गावातील पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वृक्षारोपण उपक्रम कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, बी.एन. पवार, सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगल चव्हाण, ग्रामसेवक एस.डी. निकाळजे, तलाठी माधुरी चव्हाण, कृषी अधिकारी जयवंत लोखंडे, सुनील लोखंडे, पोपट बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रा.बाबर म्हणाले, ‘गावातील ग्रामस्थांचे शारीरिक व मानसिक संतुलन आरोग्यदायी राखण्यासाठी व गावचे सौंदर्य सुशोभीत होण्यासाठी लोकसहभागातून आदर्शवत वृक्षारोपण उपक्रम घेणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही जरी काळाची गरज बनली असली, तरी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांनी जबाबदारी घेण्याचे आहे.’ प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व गरज याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सर्व तरुणवर्ग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे रावसाहेब बाबर यांनी सूत्रसंचालन केले. सागर बाबर यांनी आभार मानले.

040921\img20210903094142.jpg

वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्वाचा:प्रा.विश्वंभर बाबर

Web Title: Public participation of villagers is important for tree planting: Babur all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.