रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:14+5:302021-02-05T09:14:14+5:30
यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, शिवसमर्थ समूहाचे प्रमुख ...

रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती
यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, शिवसमर्थ समूहाचे प्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे, बाजीराव पवार, संदीप डाकवे, हणमंत बोत्रे, मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच व्यापारी उपस्थित होते.
यावेळी रस्ता सडक सुरक्षा, जीवनरक्षा, सुरक्षित अंतर, सुरक्षित प्रवास अशा माहितीपूर्ण आशयाच्या फलकांचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्यावरील रिक्षा व इतर वाहने यांना रिप्लेक्टरसाठी रेडीयम लावण्यात आले.
पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान आठवडा किंवा महिन्याभरापुरते न राहता ते वर्षभर पाळावे, असेही आवाहन केले.
फोटो : ३१केआरडी०२
कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृतीवर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सूर्यकांत पाटील, अॅड. जनार्दन बोत्रे, संदीप डाकवे आदी उपस्थित होते.