सातारा - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे शनिवारी रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री हजर झाला. यावेळी फलटण शहर पोलिस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संबंधित डॉक्टर महिलेने आपल्या हातावर पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचे तर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचे लिहिले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली. आरोपी पीएसआय बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी फलटण पोलिस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके बीड, पुणे, पंढरपूर आधी ठिकाणी रवाना केली होती. शुक्रवारी दिवस आणि रात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा गोपाळ बदने हा फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई सुरू केली. बदने पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजतात फलटणमधील नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला. दोन दिवस कोणी मदत केली का ?
दोन दिवस तो नेमका कुठे कुठे फिरला. त्याला कोणी कोणी मदत केली. याची सारी माहिती पोलिस त्याच्याकडून घेत आहेत. आता पीएसआय बदने याच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधीच पत्करली शरणागती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटण येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहेत. तर दुसरीकडे पीएसआय बदने हा फरार होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आणि तणाव होता. मात्र बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Web Summary : PSI Gopal Badne, accused of rape in the doctor suicide case, surrendered to Falton police. The doctor alleged rape and harassment in a note. Police are investigating who aided Badne during his absconding period. The surrender occurred before the Chief Minister's visit.
Web Summary : महिला डॉक्टर आत्महत्या मामले में बलात्कार के आरोपी पीएसआई गोपाल बदने ने फलटण पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। डॉक्टर ने एक नोट में बलात्कार और उत्पीड़न का आरोप लगाया था। पुलिस जांच कर रही है कि बदने को भगोड़े रहने के दौरान किसने मदद की। आत्मसमर्पण मुख्यमंत्री के दौरे से पहले हुआ।