शहापूरच्या सोसायटीस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:46+5:302021-03-24T04:36:46+5:30
यावेळी सदाशिव शेलार, सर्जेराव चव्हाण, दगडू पाटील, दादासाहेब जाधव, सरपंच ताजुद्दीन मुल्ला, उपसरपंच राजेंद्र शेलार, विशाल शेलार, मंगलताई पवार, ...

शहापूरच्या सोसायटीस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
यावेळी सदाशिव शेलार, सर्जेराव चव्हाण, दगडू पाटील, दादासाहेब जाधव, सरपंच ताजुद्दीन मुल्ला, उपसरपंच राजेंद्र शेलार, विशाल शेलार, मंगलताई पवार, अनिता मदने, पल्लवी शिंदे, दादासाहेब कांबळे, धोंडीराम बाबर, तानाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दत्तात्रय शेलार म्हणाले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अथक् प्रयत्नाने शहापूर गावाला नवीन विकास सेवा सोसायटी ही सहकारी संस्था मंजूर झाली. शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत गरजेचे साधन असून विविध योजनांच्या लाभासह खते, बी-बियाणे व पीक संवर्धनासाठी कर्ज उपलब्ध होऊन अडीअडचणीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊन उन्नतीत भर पडणार आहे.
पोपट शिरतोडे, हणमंत जाधव, शंकरराव पाटील, सुभाष शेलार, दादासाहेब शेडगे, अमृत चव्हाण, संदेश कांबळे, सचिव सयाजी पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : २३केआरडी०३
कॅप्शन :
शहापूर, ता. कऱ्हाड येथील विकास सोसायटीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.