कोरोनाबाधित मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी विशेष निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:29+5:302021-06-16T04:50:29+5:30
मलकापूर : कोरोनाबाधित एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी एकत्रित ५ हजार रुपये खर्च येतो. मलकापूर पालिकेने पाचवडेश्वर स्मशानभूमीत नऊ महिन्यांत तीनशे ...

कोरोनाबाधित मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी विशेष निधी द्या
मलकापूर : कोरोनाबाधित एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी एकत्रित ५ हजार रुपये खर्च येतो. मलकापूर पालिकेने पाचवडेश्वर स्मशानभूमीत नऊ महिन्यांत तीनशे मृतदेहांवर विनामूल्य अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी पालिकेला सुमारे ९ लाख रुपये खर्च आला. इतर कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे पालिकेवरच आर्थिक बोजा पडत आहे. हे विचारात घेऊन शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
मनोहर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक बाधितांना जीव गमवावा लागला आहे. त्याच पध्दतीने कऱ्हाड तालुक्यातही बाधितांचे प्रमाण होते. बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हाधिऱ्यांकडून मलकापूर शहरासह कऱ्हाड दक्षिणमधील कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी वेगळ्या स्मशानभूमीची सोय करण्यात आली. मलकापूरसह कृष्णा रुग्णालय, काले प्राथमिक आरोग्य केंद्र व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर पाचवडेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मलकापूर पालिकेवर सोपवली होती. त्यानुसार पालिकेने आजअखेर एकूण तीनशे मृतदेहांवर विनाशुल्क अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये मलकापुरातील केवळ ६४ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणारा खर्च पालिकेकडून केला जातो. एका मृतदेहासाठी सर्वसाधारणपणे ५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे पालिकेने आजअखेर ९ लाख रुपये खर्च केलेला आहे. याकरिता जिल्हा प्रशासन अथवा राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. तरीही पालिकेला संकलित कर व पाणीपट्टीव्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना पालिकेच्या फंडातून हा खर्च केला आहे. याचा बोजा पालिकेवर पडलेला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतिव्यक्ती ५ हजार अनुदान मिळणे आवश्यक आहे.
यासंदर्भात मलकापूर पालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठविला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिफारसपत्रही दिले आहे.
कोट
कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी आपापल्या स्तरावर निधी उपलब्धतेसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत. या कामासाठी मलकापूर पालिका सातत्याने पाठपुरावा करत आहे.
- मनोहर शिंदे
उपनगराध्यक्ष, मलकापूर
फोटो १५मलकापूर
मलकापूर पालिकेच्या वतीने उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कोरोनाबाधित मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली. या वेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गजानन आवळकर उपस्थित होते.
===Photopath===
150621\press note photo2.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
मलकापूर पालिकेच्या वतीने उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कोरोनाबाधित मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी विशेष निधी द्यावा आशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली. यावेळी गृराज्यमंत्री सतेज पाटील, गजानन आवळकर उपस्थित होते.