परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST2021-04-24T04:40:10+5:302021-04-24T04:40:10+5:30

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन ...

Provide quality facilities to patients in Parli area | परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सुविधा द्या

परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सुविधा द्या

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, तसेच परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सोयी-सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे व रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

परळी (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वयंम सामाजिक संस्था सातारा आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कोरोना मदत केंद्राच्या (सातारा शहर व तालुका मर्यादित) उद्‌घाटनप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्य विद्या देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज विभुते, परळी आरोग्य केंद्राचे डॉ. सचिन यादव, डॉ. उर्मिला बनगर, आदी मान्यवर उपस्थित होते.

या कोरोना मदत केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोना तपासणीबद्दलचे गैरसमज दूर करणे, बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे, भागात बेडची उपलब्धता जाणून घेणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या बाबींचे पालन करून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

चौकट

परळी ग्रामपंचायत; रुग्ण कल्याण समितीने सुविधा द्याव्यात

लसीकरणासाठी डोंगरकपारीतून रुग्ण येतात त्यांना बसवण्यासाठी निवारा खुर्च्या पाण्याची सोय यामध्ये हलगर्जीपणा नको. त्यांना आरोग्य केंद्रात आल्यावर परिसरात सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत परळी व रुग्णकल्याण समितीने प्रयत्न करावा.

फोटो ओळ- परळी येथे कोरोना मदत केंद्राचे उद्‌घाटन करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी राजू भोसले, सरिता इंदलकर, अरविंद जाधव, विद्या देवरे आदी

Web Title: Provide quality facilities to patients in Parli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.