कंपनीच्या सीएसआर फंडातून आरोग्य सुविधा पुरवा : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:42+5:302021-05-23T04:38:42+5:30
कोयनानगर : पाटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अनेकांना उपचाराअभावी प्राणास मुकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पवनचक्की कंपन्यांसह महाजनको ...

कंपनीच्या सीएसआर फंडातून आरोग्य सुविधा पुरवा : देसाई
कोयनानगर : पाटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अनेकांना उपचाराअभावी प्राणास मुकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पवनचक्की कंपन्यांसह महाजनको कंपनीकडून सीएसआर फंडातून पाटण तालुक्यात आरोग्यविषयक आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, पाटण तालुक्याचे सुपुत्र नरेश देसाई यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुका दुर्गम असून, ठिकाणी आरोग्य सेवेच्या बाबतीत मागासलेला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाने कहर केला असून, आवश्यक वैद्यकीय साधनसुविधांअभावी जिवास मुकावे लागत आहे. तालुक्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून व पवनचक्की प्रकल्प उभारून राज्याच्या कृषी औद्योगिक क्षेत्रात बळ दिले आहे. कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी म्हणून पवनचक्क्या कंपनीच्या व महाजनको कंपन्यांनी सीएस आर फंडातून रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हॅटिंलेटर मशीन, या व इतर आवश्यक आरोग्य विषयक साधने, सुविधा देऊन मदत करावी. यामुळे तालुक्यात आरोग्य सुविधा मिळून अनेकांचे प्राण वाचणार आहेत.