पालिका कर्मचाऱ्यांना मोफत घरे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST2021-02-23T04:58:50+5:302021-02-23T04:58:50+5:30

सातारा : शाहूपुरी येथे असलेल्या चोरगे माळावर पालिका कर्मचा-यांना मोफत घरे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष ...

Provide free housing to municipal employees | पालिका कर्मचाऱ्यांना मोफत घरे द्या

पालिका कर्मचाऱ्यांना मोफत घरे द्या

सातारा : शाहूपुरी येथे असलेल्या चोरगे माळावर पालिका कर्मचा-यांना मोफत घरे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत फेडरेशनची मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सफाई कर्मचा-यांना श्रमसाफल्य योजना, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना चोरगे माळ येथे मोफत घरे मिळावीत, अशी मागणी गणेश दुबळे यांनी केली. संबंधित जागेवर मैलाचा खड्डा हे आरक्षण आहे. आरक्षण बदलून हा भूखंड कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आरक्षित ठेवला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले.

दरम्यान, हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून धरण्यात यावी. महागाईभत्ता देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात याव्यात, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. बैठकीला नगर परिषद विभागाध्यक्ष नितीन रणदिवे, सुनील भोजने, मनीष कांबळे, मनोज बिवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Provide free housing to municipal employees