रिंकू शर्माच्या हत्येचा साताºयात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST2021-02-15T04:34:35+5:302021-02-15T04:34:35+5:30

सातारा : जय श्रीरामची घोषणा देऊन श्रीराम मंदिरासाठी ऐच्छिक वर्गणी मागितल्याने दिल्लीत रिंकू शर्मा या तरुणाची हत्या करण्यात आली. ...

Protest against Rinku Sharma's murder | रिंकू शर्माच्या हत्येचा साताºयात निषेध

रिंकू शर्माच्या हत्येचा साताºयात निषेध

सातारा : जय श्रीरामची घोषणा देऊन श्रीराम मंदिरासाठी ऐच्छिक वर्गणी मागितल्याने दिल्लीत रिंकू शर्मा या तरुणाची हत्या करण्यात आली. यामधील नराधमांचा निषेध साताºयातील पोवई नाक्यावर भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी रिंकू शर्माची हत्या करणाºया नराधमांचा निषेध नोंदविला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, राष्ट्रीय स्वयसंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मुकुंद आफळे, तालुका कार्यवाह श्रीधर कुलकर्णी, भाजपचे सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, तसेच बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो दि.१४सातारा भाजप...

फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाक्यावर भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी रिंकू शर्माची हत्या करणाºयांचा निषेध केला.

...........................................................

Web Title: Protest against Rinku Sharma's murder