जल शुद्धीकरण केंद्रात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 28, 2014 23:24 IST2014-07-28T22:54:23+5:302014-07-28T23:24:26+5:30

सांबरवाडीजवळ घटना : पाय घसरून पडल्याचे निष्पन्न

Protector's death at the Water Purification Center | जल शुद्धीकरण केंद्रात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

जल शुद्धीकरण केंद्रात सुरक्षारक्षकाचा मृत्यू


बामणोली : यवतेश्वरजवळील सांबरवाडी येथे सातारा पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दीपक विठ्ठल जाधव (वय ३५ रा. यवतेश्वर) या युवकाचा पाय घसरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी सातारा पालिकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून दीपकची नियुक्ती झाली होती. त्याचे वडीलही पालिकेत कार्यरत आहेत. सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. रविवारी दुपारी चार ते रात्री बारापर्यंत त्याची ड्युटी होती. त्यानंतर त्याच्या भावाची तेथे ड्युटी होती.

Web Title: Protector's death at the Water Purification Center