अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:30+5:302021-08-15T04:39:30+5:30
रामापूर : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीने मोरणा नदीवर असणाऱ्या २५ शेतकऱ्यांच्या मोटारी व इतर साहित्य वाहून गेल्याने त्याचे प्रचंड ...

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल
रामापूर : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीने मोरणा नदीवर असणाऱ्या २५ शेतकऱ्यांच्या मोटारी व इतर साहित्य वाहून गेल्याने त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून तो संबंधित विभागाकडे जमा करण्यात आला.
पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर धरणावर मोरणा नदीकाठी नाटोशी गावातील जवळजवळ २५ शेतकऱ्यांनी शेतीसाठी असणाऱ्या १५ आणि २० एचपी मोटारी, शेती अवजारे, पंपगृह आदींचे मोठ्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पडझड व साहित्य वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून जलसंपदा विभागाच्या कार्यालयात पंचनाम्यासहित सर्व प्रस्ताव सादर करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव, शिवसेनेचे सुरेश पाटील, पाटण तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय हिरवे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते