नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर

By Admin | Updated: June 25, 2016 00:41 IST2016-06-25T00:30:54+5:302016-06-25T00:41:29+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय : नगरपंचायत प्रभाग रचनेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर

Proposal for the construction of municipal ward | नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर

नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर

सातारा : जिल्ह्यातील आठही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या मेढा, पाटण, दहिवडी, वडूज आणि खंडाळा नगरपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, येत्या १४ जुलैपर्यंत या नगरपंचायतींची आरक्षण सोडत होणार असल्याने या शहरांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह विविध माहितीचा प्रारूप प्रस्ताव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सादर केला आहे.
तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या मेढा, पाटण, दहिवडी, वडूज आणि खंडाळा या ग्रामपंचायती बरखास्त करून तेथे नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने या नगरपंचायतीच्या निवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे. या पाचही नगरपंचायतींची सदस्य संख्या विभागीय आयुक्तांनी निश्चित केली होती. पाचही शहरांमध्ये प्रत्येकी १७ नगरसेवक निवडून जाणार असून, यात ९ महिला व ८ पुरुष असणार आहेत.
या नगरपंचायतीतील प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तेथील मुख्याधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांतर्फे तयार करण्यात येऊन ४ जुलैपर्यंत तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी ८ जुलैपर्यंत या प्रस्तावास मान्यता देतील. त्यानंतर प्रत्येक नगरपंचायतीच्या सदस्यपदाची आरक्षणासह सोडत काढण्याची नोटीस ११ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यानंतर १४ जुलैपर्यंत आरक्षणाची सोडत मुख्याधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत काढण्यात येणार आहे. १८ ते २७ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी हरकतींवर सुनावणी
देणार आहेत. ६ आॅगस्टपर्यंत हरकतींवर अभिप्राय देऊन अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. ११ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal for the construction of municipal ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.