कृषी प्रदर्शनाचा प्रचाररथ राज्यात रवाना
By Admin | Updated: November 12, 2014 23:57 IST2014-11-12T21:00:06+5:302014-11-12T23:57:48+5:30
आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच यंदा पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देखील संपूर्ण देशभरातून प्राणी आणले जाणार आहेत़

कृषी प्रदर्शनाचा प्रचाररथ राज्यात रवाना
कऱ्हाड : चारशेहून अधिक स्टॉल असलेले येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या तयारीला वेग आला आहे़ आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच यंदा पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देखील संपूर्ण देशभरातून प्राणी आणले जाणार आहेत़
या प्रदर्शनाची माहिती राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचा प्रचाररथ तयार केला असून, हा रथ राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे़ या प्रचार रथाबरोबर या प्रदर्शनाची माहिती देणारे दूत व विशेष सीडीद्वारे प्रदर्शनाची माहिती दाखविली जाणार आहे़ या प्रदर्शनाच्या वैविध्यतेमुळे दरवर्षी हे प्रदर्शन गर्दीचा उच्चांक मोडत आले आहे़
या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना देखील याचा चांगला लाभ होत आहे़ या प्रदर्शनामधील सध्या सर्व स्टॉल बुकिंग झाले असून, मंडप उभारणीही वेगाने सुरू आहे़ अशी महिती या प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष सभापती दाजी पवार यांनी दिली़ येथील बैलबाजार आवारामध्ये प्रदर्शनाच्या प्रचार रथाच्या पूजनाचा कार्यक्रम आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाला़ अॅड़ विद्याराणी साळुंखे मदनराव मोहिते, मनोहर शिंदे, जयंत पाटील, जयवंत जगताप, यांच्या उपस्थितीत झाला़
या कार्यक्रमास प्रदीप जाधव, आनंदराव सुतार, रमेश लवटे, शिवाजी मोहिते, शिवाजी पवार, रवींद्र पाटील, वसंत पाटील, हेमंत जाधव, बाळासाहेब यादव, जे़ के़ पाटील, अण्णासाहेब जाधव, वसंतराव आळंदे, डॉ़ अशोकराव पवार, वैभव थोरात, शिवाजी जमाले, शब्बीर मुजावर, सुनील कुराडे, राजेंद्र पाटील, दत्ता गुरव, सुनील पाटील-कवठेकर, बाजार समितीचे उपसभापती सुनील रामचंद्र पाटील, संचालक मानसिंगराव जगदाळे, प्रकाश पाटील, हिंदुराव चव्हाण, प्रतापराव देशमुख, किशोर पाटील, दिलीप पाटील, तसेच संदीप गिड्डे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)