शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:38 PM

वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले.

ठळक मुद्देगाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी तर कृष्णेचा साखर उतारा सर्वाधिक

संजय कदम ।वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तर १ कोटी ३ लाख ७७ हजार ४०५ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या एकूण साखर कारखान्यांपैकी जवळपास नऊ कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. उर्वरित सर्वच कारखाने दि. २५ ते ३० एप्रिलअखेर बंद होतील, अशी माहिती साखर कारखानदारांनी दिली आहे.सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम यंदा दि. ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. जवळपास १५० ते १६० दिवसांच्या या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. दि. १८ एप्रिलअखेर जवळपास नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सह्याद्री कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १२ लाख ५६ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १५ लाख ६२ हजार १९५ क्विंटल साखर उत्पादित केली. या कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक साखरनिर्मिती केली आहे. तर या पाठोपाठ कृष्णा सहकारी कारखान्याने ११ लाख ५७ हजार २५० टन उसाचे गाळप करत १४ लाख ७२ हजार २८० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक १२.७२ एवढा राहिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जरंडेश्वर शुगर मिल्स हा कारखाना राहिला असून, या कारखान्याने ९ लाख १० हजार ९३० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १० लाख ९८ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.याशिवाय शरयू कारखान्याने ८ लाख ४१ हजार ५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९ लाख १७ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. स्वराज ४ लाख ९४ हजार ३३ टन उसाचे गाळप करत ५ लाख ३४ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ग्रीन पॉवरने ६ लाख १४ मेट्रिक टन गाळप पूर्ण करत ७ लाख १ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने ६ लाख १४ हजार १० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ९६ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. न्यू फलटण साखरवाडी कारखान्याने २ लाख ८३ हजार ४५७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करत ३ लाख ३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खंडाळा तालुका साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार १६० मेट्रिक टन ऊस गाळप करून ३ लाख ३३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.रयत कारखान्याने ४ लाख ४४ हजार ९४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ७ हजार ९८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ३३ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४२ हजार २५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. किसन वीर कारखान्याने ८ लाख १८ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर श्रीराम कारखान्याने ३ लाख ८५ हजार ९३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ४ लाख ४८ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.चार कारखान्यांचे गाळप लवकरच संपणारउसाअभावी जिल्ह्यातील श्रीराम-(जवाहर) फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराज फलटण, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर गोपूज, शरयू फलटण या नऊ कारखान्यांचे गाळप दि. १५ एप्रिलअखेर बंद झाले आहे. तर उर्वरित चार कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलअखेर संपणार आहे.वर्ष साखर गाळप मे. टन साखर (लाख क्विंटल)२०१४-१५ ७५ लाख ६५ हजार ६३२ ८९ लाख ६ हजार २९२०१५-१६ ७७ लाख ६५ हजार ३७८ ९० लाख ६६ हजार १८२०१६-१७ ५४ लाख ३६ हजार ९३५ ६४ लाख ५१ हजार ७२

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर