कोरेगावात विनापरवाना गणेश मूर्तीची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:11+5:302021-09-12T04:45:11+5:30
कोरेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करत कुमठे (ता. कोरेगाव) येथील श्री सावता माळी गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची वाजत-गाजत ...

कोरेगावात विनापरवाना गणेश मूर्तीची मिरवणूक
कोरेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करत कुमठे (ता. कोरेगाव) येथील श्री सावता माळी गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवाजी भीमराव रोमण (वय ३०) याच्यासह दहा युवकांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी समाधान गाढवे हे शुक्रवार, दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास सातारा-लातूर महामार्गावर गस्त घालत असताना, त्यांना सरस्वती विद्यालयाजवळ कुमठे येथील श्री सावता माळी गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून मिरवणूक काढली असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅक्टरमालक शिवाजी रोमण याच्यासह दहा युवकांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार केशव फरांदे तपास करत आहेत.