गाड्या परत देण्याची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:13+5:302021-06-09T04:47:13+5:30
जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एवढ्या दिवस घरात असलेले नागरिक रस्त्यावर आले. परिणामी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ...

गाड्या परत देण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एवढ्या दिवस घरात असलेले नागरिक रस्त्यावर आले. परिणामी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडवला गेला. अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. पहिल्या दिवशीच ही स्थिती असेल तर यापुढे आणखी काय होईल, याची चिंता आता प्रशासनाला लागली आहे. अनलॉक झाले असले तरी नागरिकांनी बेफिकीर वागू नये, अन्यथा कोरोनाची ही दुसरी लाट जिवावर उठेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
..........
गाड्यांच्या बॅटरी खराब
लॉकडाऊनमुळे अनेक दिवस चारचाकी गाड्या घरातील पार्किंगमध्ये धूळ खात पडून होत्या. अनेकांनी या गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाड्यांच्या बॅटरी खराब झाल्याचे समोर आले. त्यामुळे कारचालकांना गॅरेजमधून दुरुस्ती करण्याला बोलवावे लागले. अनेकांनी बॅटरी खराब झाल्यामुळे नवीन बॅटरी टाकल्या, तर काहीनी बॅटरी चार्ज केली. नवीन बॅटरी खरेदी करताना मनमानी दर आकारले गेल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
......
गाड्या परत देण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या जप्त करण्याचा सपाटा लावला होता. जिल्ह्यात जवळपास पोलिसांनी ७६७ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने आता परत देण्याची प्रक्रिया पोलिसांकडून लवकरच सुरू होणार आहे. काही पोलीस ठाण्याकडून या गाड्या आता परत देण्यात येत आहेत. गाड्या घरी आणण्यासाठी अनेक जणांनी सोमवारी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मात्र दंड भरल्याशिवाय कोणालाही गाडी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
...................................................................................