गावशिवार फेरीतून समस्यांचे निराकरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:48+5:302021-03-25T04:37:48+5:30
खंडाळा : गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच हेच विकासाचे धोरण राबवित असतात. या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकजण निवडणुकीत मतदारांची ...

गावशिवार फेरीतून समस्यांचे निराकरण...
खंडाळा : गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच हेच विकासाचे धोरण राबवित असतात. या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकजण निवडणुकीत मतदारांची घरे पूजत असतात; पण हीच माळ गळ्यात पडल्यानंतर अनेकांना कामाचा विसर पडतो. परंतु खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथील नूतन सरपंचांनी गावशिवार फेरी काढून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
खेड बुद्रुक गावात सरपंच गणेश धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक वाॅर्डांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर सर्वांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून घेऊन त्यावर नियोजनबद्ध पद्धतीने विचार विनिमय करण्यासाठी गाव शिवार फेरीचे आयोजन केले होते. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी गावचा विकास आराखडा तयार करून मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरपंचाने घरभेटी देऊन समस्या समजून घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
या भेटीप्रसंगी सरपंच गणेश धायगुडे, उपसरपंच धनश्री रासकर, सदस्य धायगुडे, सुभाष ठोंबरे, विकास माने, मोहन बोडरे, उमा रासकर, आशा धायगुडे, पद्मा धायगुडे, अलका गडदे, उज्ज्वला वायदंडे यांसह प्रमुख उपस्थित होते.
कोट..
गावचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये तक्रार नोंदीची स्वतंत्र व्यवस्था करून त्याचे निराकरण करणार आहे. त्यासाठी गावचा सविस्तर आराखडा तयार करून कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.
-गणेश धायगुडे, सरपंच
२४खंडाळा
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथील नूतन सरपंचांनी गावशिवार फेरी काढून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.