प्रियांकाला मिळणार हक्काचे घर

By Admin | Updated: October 30, 2014 00:39 IST2014-10-30T00:39:20+5:302014-10-30T00:39:20+5:30

आशाकिरण वसतिगृह : आज लग्न सोहळा

Priyanka gets the right home | प्रियांकाला मिळणार हक्काचे घर

प्रियांकाला मिळणार हक्काचे घर

सातारा : कऱ्हाड येथील आशाकिरण महिला वसतिगृहातील प्रवेशिता प्रियांका हिचा विवाह संदीप लक्ष्मण तोडकर (कुर्ला, मुंबई) यांच्याशी गुरुवार, दि. ३० आॅक्टोबर रोजी दुपारी १.११ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षिका ज्योत्स्ना कापडे यांनी दिली. शासनाच्या महिला व बालविकास विभागातंर्गत कार्यरत असलेल्या कऱ्हाड येथील आशाकिरण महिला वसतिगृहामध्ये या विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. संदीप तोडकर यांच्या कुटुंबीयांनी संदीपचा विवाह अनाथ निराधार मुलीशी करू इच्छित असल्याबाबत वसतिगृहामध्ये संपर्क साधला होता. वसतिगृहातील निराधार प्रवेशिता प्रियांका ही विवाह योग्य असल्याने व तिच्यासाठी संदीप हे योग्य वर वाटल्याने संस्थेच्या अधीक्षिका ज्योत्स्रा कापडे यांनी प्रियांकाचा विवाह तिच्या इच्छेनुसार व शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार संदीप तोडकर यांच्याशी जुळवून आणला. यामुळे एका निराधार मुलीस आत हक्काचे घर मिळणार आहे. आशाकिरण महिला वसतिगृहात दि. ३० आॅक्टोबर रोजी दुपारी १.११ वाजता हा विवाह सोहळा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Priyanka gets the right home