शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लाच प्रकरणातील खासगी इसम निघाला मुंबईचा फौजदार, न्यायाधीश धनंजय निकम यांच्या घरातही तपासणी 

By नितीन काळेल | Updated: December 14, 2024 19:22 IST

सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह ...

सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामधील खासगी इसम किशोर खरात हे मुंबईत सहायक फाैजदार असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच न्यायाधीश निकम यांच्या घरातही तपासणी करण्यात आली, अशी माहिती पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली.पुणे येथील एका महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झाली आहे. तसेच त्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज मंजूर करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकजण अशा चाैघांच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. तर याप्रकरणी न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण, तो फेटाळला आहे.या प्रकरणाचा तपास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. या विभागाच्या तपासणीत सुरुवातीला किशोर खरात हे खासगी इसम होते, असे समोर आलेले. पण, तपासादरम्यान खरात हे मुंबईतील वरळी येथे सहायक फाैजदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. तर न्यायाधीश धनंजय निकम यांच्या साताऱ्यातील घरातही विभागाने पाहणी केली. पण, तेथे काही आक्षेपार्ह आढळले नाही, अशी माहितीही पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण