खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनही दरवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:31+5:302021-08-17T04:44:31+5:30
सातारा जिल्ह्यात एसटीनं जाळं चांगलं विणलं असलं तरी अनेक मंडळी खासगी वाहनाने किंवा भाड्याने कार घेऊन जाणे पसंत करतात. ...

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनही दरवाढ!
सातारा जिल्ह्यात एसटीनं जाळं चांगलं विणलं असलं तरी अनेक मंडळी खासगी वाहनाने किंवा भाड्याने कार घेऊन जाणे पसंत करतात. कोरोना येण्यापूर्वी हौस, मौजमजेसाठी अनेक कुटुंबे गाडी भाड्याने घेऊन जात होते. हवे त्या ठिकाणी थांबता येते. केव्हाही निघता येत असल्याने ही सुविधा फायद्याची वाटते; पण कोरोनामुळे सर्वच व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे महागाईने डोके वर काढले. या व्यवसायाला जोडून असलेले अनेक घटकांचे दर वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणारे अडचणीत आले आहेत. डिझेलच्या दरात २३ रुपयांनी वाढ झाली आहे. सुटे भाग, टोलमध्ये वाढ झाल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाला. त्यामुळे उपासमारीची वेळ आली. साहजिकच उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कोट :
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दोन वर्षांनंतर दरवाढ केली आहे. वाहनांचे सुटे भाग, दुरुस्ती, डिझेलचे दर वाढल्याने व्यवसाय करणेच अवघड झाले आहे. त्यामुळे प्रवासी दरातही वाढ करण्यासाठी पर्यायच उरलेला नाही.
- विजय पवार,
चालक.
कोट
कोरोनानंतर हौस म्हणून फिरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महिन्यात दहा दिवसही गाडी पळत नाही. बँकेचा तिसरा हप्ता थकला तर बँकेचे वसुली अधिकारी दारात येतात. गाडीला ग्राहक नसले तरी चालकाला पगार द्यावाच लागतो. त्यामुळे हा व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्नच आहे.
- नीलेश मोरे,
चालक.
चौकट
प्रवासी वाहनांचे दर
वाहनांचा प्रकार दर
रिक्षा १०
चार आसनी १३ रुपये किलोमीटर
सहा आसनी २३ रुपये किलोमीटर
छोटा हत्ती ३५० रुपये फेरी
चौकट
असे वाढले पेट्रोल, डिझेलचे दर
जानेवारी २०१९
जानेवारी २०२०
जानेवारी २०२१
ऑगस्ट २०२१