खासगी सावकाराला चार दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:54+5:302021-03-15T04:35:54+5:30

विजय ऊर्फ विराट विलास चव्हाण (रा. उत्तर कोपर्डे) असे अटकेतील सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोपर्डेतील सावकार ...

Private lender remanded in police custody for four days | खासगी सावकाराला चार दिवस पोलीस कोठडी

खासगी सावकाराला चार दिवस पोलीस कोठडी

विजय ऊर्फ विराट विलास चव्हाण (रा. उत्तर कोपर्डे) असे अटकेतील सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोपर्डेतील सावकार विजय ऊर्फ विराट चव्हाण हा बेकायदा सावकारी करीत होता. दरमहा २० टक्के व्याजदराने पैसे देऊन तो हप्ता चुकवल्यास कर्जदाराला दररोज चक्रवाढ व्याज लागू करीत होता. त्याने अनेकांची पिळवणूक करून याचपद्धतीने पैसे वसूल केले आहेत. त्याच्या विरोधात शहापूर येथील प्रसाद गजानन खेडकर यांनी उंब्रज पोलिसात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार सावकार चव्हाण यांच्यावर उंब्रज पोलिसात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पसार झाला होता. अखेर उंब्रज पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.

Web Title: Private lender remanded in police custody for four days