शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबलसह खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:01 IST

सातारा : अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांना चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या ...

ठळक मुद्देकॉन्स्टेबलसह खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या जाळ्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वीकारले चार हजार

सातारा : अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांना चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून कॉन्स्टेबलसह एका खासगी व्यक्तीला पकडले. मिसिंग व्यक्तीच्या लग्नासाठी साक्षीदार असलेल्या व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी चार हजारांची लाच त्यांनी स्वीकारली.अभिषेक आनंदराव डोळस (रा. पवार कॉलनी शाहूपुरी सातारा) असे पोलिस कॉन्स्टेबल तर अजय शिवाजीराव इनामदार (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मिसिंगचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील मिसिंग व्यक्तीच्या लग्नाला साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या तक्रारदारावर अपहरणाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉन्स्टेबल डोळस याने लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून शनिवारी शाहूपुरी पोलीस स्टेशन परिसरात सापळा लावला होता. मात्र, डोळस याने इनामदार याच्या कार्यालयात पैसे देण्याचे तक्रारदाराला सांगितले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी प्रतापगंज पेठेत असलेल्या इनामदार याच्या कार्यालयाबाहेरच सापळा लावला.

इनामदार हा तक्रारदाराकडून चार हजार रुपये घेताना लाचलुचपतच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ पकडले. या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अधिकाºयांनी सुरू केली.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार भारत शिंदे, संजय साळुंखे, विनोद राजे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, विशाल खरात, निलेश येवले , संभाजी काटकर, महिला पोलीस श्रध्दा माने, शितल सपकाळ यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर