शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:08 IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आरोप

कराड (जि. सातारा) : ‘देशात विरोधी पक्षाने दुबार मतदार नोंदणीचा विषय लावून धरला आहे. महाराष्ट्रात तर दुबार मतदार नोंदणी पुनरावलोकन समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काम पाहत आहेत. मात्र, त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी दुबार व तिबार नावनोंदणी केली आहे,’ असा आरोप मतदार यादी पुराव्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या गैरप्रकाराला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती असल्याचे सांगत यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच ही कला साधली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.कराड येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. यावेळी कराड दक्षिण भाजपचे अध्यक्ष धनाजी पाटील, मोहनराव जाधव, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, कराडच्या माजी नगराध्यक्षा सुषमा लोखंडे उपस्थित होत्या.धनाजी पाटील व मोहनराव जाधव म्हणाले, खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील घरामधील १५ व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये आहेत. आता एवढी सगळी मंडळी येथे राहतात का? हा संशोधनाचा भाग आहे, पण त्यांचे पुतणे इंद्रजित पंजाबराव चव्हाण, त्यांची पत्नी आशा इंद्रजित चव्हाण या दोघांची नावे कराड, मलकापूर व पाटण विधानसभा मतदारसंघांतील कुंभारगाव या ३ ठिकाणी मतदार यादीमध्ये आहेत.इंद्रजित चव्हाण यांच्या आई शांतादेवी चव्हाण यांचे नाव देखील कराड व मलकापूर या २ ठिकाणी मतदार यादीमध्ये आहे, तर इंद्रजित चव्हाण यांचा मुलगा अभिजित इंद्रजित चव्हाण याचे नाव मलकापूरमधील एकाच मतदान केंद्रावर दोन ठिकाणी नोंदविले गेले आहे.

आमदार अतुल भोसले यांच्या दोन पीएंची दोन विधानसभा मतदारसंघात नावे : काँग्रेसकार्यकर्त्यांचा आरोपकराड : ‘भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहायक अमोल रायसिंग पाटील व फत्तेसिंग भीमराव सरनोबत हे दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. त्या दोघांची त्यांच्या मतदारसंघाबरोबरच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही नोंदणी आहे,’ असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला, तर कराडमध्ये कृष्णा विद्यापीठात शिकणाऱ्या इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचीही नावे शिवनगरच्या मतदार यादीत समाविष्ट करून घोळ केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.कराड येथे शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले. यावेळी इंद्रजीत चव्हाण, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अजितराव पाटील-चिखलीकर, दिग्विजय सूर्यवंशी, प्रदीप जाधव उपस्थित होते.