शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ई मेलद्वारे धमकी, कऱ्हाडातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला

By संजय पाटील | Updated: July 30, 2023 15:49 IST

Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून ई मेलद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे.

- संजय पाटीलकऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून ई मेलद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली असून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कऱ्हाडातील पाटण कॉलनीतील निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.दरम्यान, ईमेलद्वारे धमकी देणाºया अज्ञातावर कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेडमधून एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र, अद्याप पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा एक व्हिडीओ दोन दिवसांपुर्वी समोर आला. त्यामध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आल्यानंतर त्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी चुकीचे विधान केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशानात संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची व अटकेची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या मागणीवेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण हे आक्रमक झाले होते. तसेच त्यानंतर राज्यभर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भुमिका घेतलेली असतानाच त्यांना ई मेलद्वारे अज्ञाताकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमदार चव्हाण यांना अज्ञाताने ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर क-हाडात पाटण कॉलनीमध्ये असलेल्या आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर