पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला भगिनींशी संवाद

By Admin | Updated: October 5, 2014 23:03 IST2014-10-05T22:20:30+5:302014-10-05T23:03:58+5:30

वारुंजीसह परिसरात झालेल्या रोड शोला नागरिकांनी दुतर्फा उभे राहून स्वागत केले़

Prithviraj Chavan interacted with Sage sisters | पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला भगिनींशी संवाद

पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला भगिनींशी संवाद

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदार संपर्क दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ वारुंजीसह परिसरात झालेल्या या रोड शोला नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले़ वारुंजी, खोडशी, वनवासमाची आदी गावांत सुमारे २५ जणांच्या घरी जाऊन त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या़ त्यांचा हा रोड शो अडीच तास सुरू होता, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे़ यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाडकरांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो, तेच आशीर्वाद या निवडणुकीत कायम ठेवा़ भाजपच्या हातात केंद्रातील सत्ता दिली; मात्र १०० दिवसांत काहीच फरक पडलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत जाहिरात बाजीला फसणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
पृथ्वीराज चव्हाणांच्या दौऱ्यात आमदार आनंदराव पाटील, जयवंत जगताप, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, नाना पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Prithviraj Chavan interacted with Sage sisters