‘कॉँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे श्रेय पृथ्वीराज चव्हाणांनाच

By Admin | Updated: November 14, 2014 23:16 IST2014-11-14T22:28:20+5:302014-11-14T23:16:35+5:30

विलासराव उंडाळकरांचा घणाघात : खून खटल्यात गोवणाऱ्यांना सोडणार नाही

Prithviraj Chavan is credited with 'Congress-free Maharashtra' | ‘कॉँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे श्रेय पृथ्वीराज चव्हाणांनाच

‘कॉँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे श्रेय पृथ्वीराज चव्हाणांनाच

सातारा : ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी दिल्लीत जाऊन कहाण्या रंगविल्या. स्वत: क्लिन आहे, असं भासवत त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँगे्रस क्लिन केली. महाराष्ट्राला काँगे्रसमुक्त केले,’ अशी उपहासात्मक टीका माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये केली.
‘राजकीय सूडबुद्धीतून विधी व न्याय खात्याचा गैरवापर केला गेला. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च्या मर्जीतील अधिकारी साताऱ्यात आणले. सरकारी अधिकाऱ्यांचा वापर खासगी कामांसाठी झाला. खाकी वर्दीवाल्यांनाही त्यामुळे नशा चढली. माझ्या मुलाला खून खटल्यात गोवण्यात आले. मी स्वत: व माझ्या पुतण्यालाही आरोपी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये १0 ते १२ मुख्यमंत्री मी जवळून पाहिले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या इतका कोणत्याही राज्यकर्त्याने शासकीय यंत्रणेचा गैरवापर केलेला नाही.
माझी राजकीय कादकिर्द उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही,’ असा इशाराही उंडाळकरांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडकरांची फसवणूक केली,’ असे सांगताना उंडाळकर म्हणाले, ‘एका समाजाला देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ बांधून देण्याचे खोटे आश्वासन दिले. कऱ्हाडकरांना १८00 कोटींच्या विकासकामांचं आमिष दाखविलं.
याचे श्रेय घेण्यासाठी जागोजागी फ्लेक्स लावले; पण यातलं काहीच होणार नाही. वास्तविक, काँगे्रसने सर्व अधिकार त्यांना दिले होते. खरेतर, चांगलं काम करून दाखविण्याची संधी त्यांना होती.’ (प्रतिनिधी)

कऱ्हाडात कॉँग्रेस-राष्ट्रवादीची छुपी युती !
‘पी. डी. पाटलांशी हाडवैर धरणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वारसांशी मात्र तह केला होता. मी उत्तरेत येत नाही, तुम्ही दक्षिणेत येऊ नका, असे त्यांनी ठरविले होते, असा गौप्यस्फोटही उंडाळकरांनी केला. दरम्यान, ‘राष्ट्रवादीची मदत तुम्हाला झाली का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना उंडाळकरांनी साफ नकार देत, राज्यात काडीमोड घेतलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने कऱ्हाडमध्ये छुपी युती केली, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातील वाटचालीबाबत मात्र अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट करत ‘इथून पुढे नेहमी भेटत राहू,’ असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.


...प्रसंगी न्यायालयाची पायरी चढू
मुलांना शाळेतून बाहेर काढल्यानंतर संतप्त पालक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यास गेले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी ‘मुलांना जिल्हा परिषद शाळेत घाला. आता प्रवेश देण्याची सोय करतो,’ असे सांगितले होते. पण, एकाही पालकाने त्यादृष्टीने विचार केलेला नाही. यासंदर्भात पालक एकत्र येऊ लागले असून, न्यायालयाचा दरवाजा ठोठावयाचा का? यासंदर्भात तयारीही सुरू आहे. दरम्यान, पालकप्रतिनिधींची बैठक घेऊन शानभाग शाळा ही कशी निर्दोष आहे. हे शाळा व्यवस्थापनाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Prithviraj Chavan is credited with 'Congress-free Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.