त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:05+5:302021-01-20T04:38:05+5:30
सातारा : त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले आहेत. सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून, हा भाग आता ...

त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य
सातारा : त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले आहेत. सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून, हा भाग आता पालिका हद्दीत आला आहे. या भागातील सर्व समस्या सोडवून त्रिशंकू भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
गोडोली येथील पालवी चौक ते गोळीबार मैदान डोंगर पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दादा जाधव, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, ज्येष्ठ नेते व्यंकटराव मोरे, कांतिलाल कांबळे, युवराज जाधव यांच्यासह गोळीबार मैदान मित्र समूहाचे सदस्य उपस्थित होते.
त्रिशंकू भाग पालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्याने या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. या भागाचा समावेश आता पालिका हद्दीत झाला आहे. आगामी काळात या भागातील सर्व समस्या सोडवू आणि हा संपूर्ण भाग विकासाच्या प्रवाहात आणू, असा विश्वास यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.
फोटो : १९ शिवेंद्रसिंहराजे
गोडोली येथील पालवी चौक ते गोळीबार मैदान डोंगर पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याहस्ते करण्यात आले.