अगोदर अजित पवारांची अतिक्रमणे काढा !

By Admin | Updated: February 26, 2016 00:48 IST2016-02-26T00:39:25+5:302016-02-26T00:48:31+5:30

उदयनराजेंनी प्रशासनाला ठणकावले : उंब्रजची अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित

Prior to the withdrawal of Ajit Pawar's encroachment! | अगोदर अजित पवारांची अतिक्रमणे काढा !

अगोदर अजित पवारांची अतिक्रमणे काढा !

उंब्रज : येथील बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खा. उदयनराजे भोसले यांनी ‘अजित पवार व इतर नेत्यांची अगोदर अतिक्रमणे काढा, गोरगरीब व्यापाऱ्यांचे दुकान गाळे पाडून त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नयेत,’ असे तहसीलदारांना जोरदारपणे ठणकावताच प्रशासनाने ही मोहीम तत्काळ स्थगित केली.
‘जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तुम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधा व तातडीने हे काम बंद करा,’ असेही उदयनराजे ंनी ठणकावून सांगताच तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अतिक्रमणविरोधी मोहीम स्थगित ठेवण्याचा तोंडी आदेश संबंधितांना दिला.
गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार होती. परंतु शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे माजी तालुकाप्रमुख समीर जाधव, नरेंद्र पाटील, संजय मोहिते यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
यानंतर हे तिघे काही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात गेले. तेथे नरेंद्र पाटील यांनी तहसीलदार राजेंद्र शेळके, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘संबंधित गाळेधारक अल्पभूधारक आहेत. काही मागासवर्गीय आहेत. तरी ही मोहीम राबवू नये,’ असे सांगितले. परंतु ‘संबंधितांना सूचना १५ दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणार आहे. तुम्हाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर लेखी स्वरूपात द्यावी,’ असे सांगून तहसीलदार राजेंद्र शेळके पोलीस बंदोबस्तात बाजारपेठेत गेले. ११ वाजण्याच्या सुमारास अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली.
या मोहिमेत सहा जेसीबी व सुमारे वीस ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ११ ते १ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. या दरम्यान सुमारे ४०-५० दुकान गाळे पाडण्यात आले. या दरम्यान इतर दुकान व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील माल काढण्यासाठी धावपळ सुरू केली.
दरम्यान समीर जाधव यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला व ‘तुम्हीच उंब्रजची बाजारपेठ वाचवू शकता,’ असे सांगितले. त्यानंतर खा. उदयनराजे हे सातारहून तातडीने उंब्रजला आले. त्यांनी उंब्रजच्या बाजारपेठेत ‘एन्ट्री’ केली. ‘अजित पवार व इतर नेत्यांची अतिक्रमणे अगोदर काढा. गोरगरिबांची दुकान गाळे पाडू नका, काम थांबवा,’ असे सांगितले. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर अतिक्रमण स्थगितीचा आदेश देण्यात आला व ही मोहीम थांबली. (प्रतिनिधी)
 

Web Title: Prior to the withdrawal of Ajit Pawar's encroachment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.