पत्त्यांच्या क्लबवर छापा; ४३ अटकेत
By Admin | Updated: June 16, 2016 01:19 IST2016-06-16T01:14:38+5:302016-06-16T01:19:15+5:30
कऱ्हाडात कारवाई : नेत्यांसह प्रतिष्ठितांचा समावेश; अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पत्त्यांच्या क्लबवर छापा; ४३ अटकेत
कऱ्हाड : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने मंगळवारी रात्री कऱ्हाडातील पत्त्यांच्या तीन क्लबवर छापा टाकला. या छाप्यात एकूण ४३ जण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांसह अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. एकाच वेळी झालेल्या या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सांगलीसह कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील जुगार अड्ड्यांवर मंगळवारी रात्री एकाच वेळी छापा टाकण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित कारवाईवेळी नजीकच्या जिल्ह्यातील पोलिस पथक पाठविण्यात आले होते. त्यानुसार कऱ्हाडात सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी रात्री सांगली पोलिसांची तीन पथके कऱ्हाडात दाखल झाली. एक पथक शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या इमारतीमध्ये, दुसरे पथक ओगलेवाडीत, तर तिसरे पथक वारुंजी फाटा येथे गेले. संबंधित तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला.
शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या ऐश्वर्या रेडियम या दुकानाच्यावर जावेद बाबू मुल्ला (वय २०, रा. विंग, ता. कऱ्हाड) हा पत्त्याचा क्लब चालवीत होता. त्याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी २२ जणांना अटक केली. तसेच तेथून २ लाख ४७ हजार ८०२ रुपयांची रोकड, ५६ हजार ७०० रुपयांचे मोबाईल व १ लाख १० हजारांची दुचाकी असा ४ लाख १४ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधित क्लबमधील अशपाक मुल्ला व अस्मल पटेल या दोन कामगारांनाही अटक केली आहे. पोलिस नाईक महेश मारुती आवळे यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
ओगलेवाडी येथे कल्याणी बिल्डिंगनजीक नरेश प्र्रभुनाथ गुप्ता (रा. बनवडी) हा जुगार अड्डा चालवित होता. सांगलीच्या पोलिस पथकाने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. तेथून नरेश गुप्तासह ६ जणांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, खुर्च्या, टेबल, टीव्ही, गाद्या, दुचाकी, कारसह एकूण २ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस हवालदार सुनील उमाजी भिसे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. वारुंजी फाटा येथेही जुगार अड्डा सुरु होता. सांगली पोलिस पथकानेही तेथेही छापा टाकला. तेथून स्थानिक राजकीय नेत्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जुगार खेळताना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये १३ जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून ४ लाख ८८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
यामध्ये अटक केलेल्यांची नावे अशी: संभाजी काळे (४५, शनिवार पेठ), दिनकर भिंगारदेवे ( विटा), राजू शेख ( विद्यानगर), संतोष देशमुख, रवींद्र मस्के (शनिवार पेठ), प्रवीण कटरे ( बुधवार पेठ), विजय ढवळे, अधिक ताटे (जखिणवाडी), अशोक कुंभार (कोरेगाव), अनिल सावंत (बुधवार पेठ), अजिज पटेल (वारुंजी), भरत भंडारे ( शनिवार पेठ), कृष्णत रैनाक (शनिवार पेठ), विठ्ठल पवार (शुक्रवार पेठ), गणेश जाधव, शिवाजी देसाई (कोयना वसाहत), प्रशांत पाटील (कार्वेनाका), दत्तात्रय साळुंखे (गोटे), जावेद मुल्ला (विंग), अशपाक मुल्ला (मुजावर कॉलनी), अस्लम पटेल (वारुंजी).ओगलेवाडी येथे जुगार अड्ड्यावर नरेश गुप्ता ( बनवडी), विनोद वीरकायदे ( हजारमाची), नारायण कांबळे (बुधवार पेठ), सोमनाथ सूर्यवंशी ( ओगलेवाडी), महेश सुर्वे ओगलेवाडी), कुमार पळसे ( हजारमाची). विजय मोरे मन्सूर मुल्ला, सुनील माळी ( कालेटेक), सचिन माने ( नांदगाव), वसंत पवार (देवराष्ट्रे), दत्ताजीराव डुबल (शुक्रवार पेठ) वारुंजी फाटा येथील कारवाईत विजय पवार - मलकापूर), विजय तिवारी, राजेश ओसवाल , राजाराम कुंभार , लाजम अल्लाउद्दीन खोडेकर अधिकराव पाटील, दीपक लिमकर ( ओगलेवाडी), विजय मोरे (शनिवार पेठ), मन्सूर मुल्ला (, गुरुवार पेठ), सुनील माळी (कालेटेक), सचिन माने ( नांदगाव), वसंत पवार (, देवराष्ट्रे), दत्ताजीराव डुबल (६३, शुक्रवार पेठ).