कुंभारगावात निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:47+5:302021-08-20T04:44:47+5:30
चिखलेवाडीतील सावली प्रतिष्ठान सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठानकडून आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ...

कुंभारगावात निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
चिखलेवाडीतील सावली प्रतिष्ठान सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठानकडून आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमास स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे, पंचायत समितीचे उपसभापती रमेश मोरे, चिखलेवाडीचे सरपंच दिलीप मोरे, उपसरपंच सुदाम चव्हाण, सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. सुरेश यादव, प्रा. सुरेश चिखले, अरुण मोरे, विक्रम वरेकर, रवींद्र माटेकर, मंगेश माटेकर, किशोर मोरे, जितेंद्र माटेकर, सागर अनंत मोरे, मनोहर यादव, रमेश नावडकर, पोपट माने, प्रदीप माने, महादेव वरेकर यांच्यासह सर्व विजेते स्पर्धक उपस्थित होते.
सावली प्रतिष्ठानने आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले असून कोरोनाकाळात प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान गौरवास्पद आहे, असे मत डॉ. संदीप डाकवे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रमोद मोरे, विक्रम वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.सुरेश यादव यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक कारंडे यांनी आभार मानले. यावेळी गौरंग रूपेश माटेकर या चिमुकल्याने देशभक्तिपर गीत सादर केले.
फोटो : १९केआरडी०१
कॅप्शन : कुंभारगाव (ता. पाटण) येथे डॉ. संदीप डाकवे व रमेश मोरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.